दर दिवसासाठी लागणारी ताकद / सामर्थ्य - अनुवाद ३३:२५
Notes
Transcript
दर दिवसासाठी लागणारी ताकद / सामर्थ्य
"तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत; तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहोत." अनुवाद ३३:२५
१. प्रार्थनेद्वारा देवाकडून मिळणारे सामर्थ्य - मत्तय २१:२२ "आणि तुम्ही विश्वास धरुन प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल."
अ. अनेक ख्रिस्ती लोकांच्यामधे सामर्थ्याची उणिव दिसते कारण ते त्यांच्या प्रार्थनामय जिवनाविषयी फारसे जागरुक नाहीत.
आ. प्रार्थना हि ख्रिस्ती लोकांची जीवन प्रणाली आहे. प्रार्थनेच्याद्वारे आपण देवाशी संधान साधू शकतो व त्याच्या सहभागीतेमधे राहू शकतो.
इ. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, "...........तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करुन आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;" फिलीपै ४:६
२. देवाच्या अभिवचनांकडून मिळणारे सामर्थ्य - "तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुला शक्ति देतो; मी तुझे सहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो." यशया ४१:१०
अ. काही ख्रिस्ती लोकांकडे सामर्थ्याचा अभाव असतो कारण ते देवाच्या अभिवचनांकडे दुर्लक्ष करतात.
आ. आमच्या गरजा जाणून आम्ही पवित्र शास्त्रातील अभिवचने मिळवून घेतली पाहिजेत. ती अभिवचने आमची आहेत हे जाणून आम्ही ती लक्षात ठेवली पाहिजेत, आठवली पाहिजेत आणि त्यांना स्वत:ची अभिवचने समजून त्याच्यावर हक्क दाखविला पाहिजे.
इ. आम्हाला "त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत,................." २ पेत्र १:४
३. देवासाठी केलेल्या सेवा कार्यातून मिळणारे सामर्थ्य - "मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे." फिलीपै ४:१३
अ. देवाचे कार्य करण्याकडून ख्रिस्ती व्यक्ति सामर्थ्य मिळवते. देव त्यांना अशी क्षमता देतो की, त्याद्वारे ते देवाचे कार्य पूर्ण करुन त्याच्या नावाला गौरव देतील.
आ. अनेक लोक देवाचे कार्य करण्यामधे कमी पडतात. कारण ते त्याची स्वत:ची कामं करण्यामधे जास्त गुंतलेले असतात.
इ. देवासाठी वेळ द्या. त्यानी अभिवचन दिले आहे की, "तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो." यशया ४०:२९
४. देवाचे गौरव करण्याकडून मिळणारे सामर्थ्य : स्तो ७१:१४ - "मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन. प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करीत येईन; तुझ्या केवळ तुझ्याच, नीतिमत्वाचे मी निवेदन करीन."
अ. मी अधिकाधिक प्रभूची स्तुति करीन, असे सांगून स्तोत्र कर्ता म्हणतो की, "मी देवाच्या सामर्थ्यामधे जाईन."
आ. आम्ही देवाची स्तुति करण्याकडून सामर्थ्य मिळवून घेतो. स्तुति आमच्यामधे सकारात्मक विचार निर्माण करते आणि आमच्या निरूत्साही झालेल्या आत्म्याला वर उचलते.
इ. देव सर्व स्तुतीत योग्य असा आहे. आम्ही त्याची पुरेशी स्तुति कधीच करू शकत नाही. स्तोत्र कर्ता म्हणतो, "परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल." स्तोत्र ३४:१
Page 2 of 2
15 January 2021 (c) Deepak Kasote00