आनंदाने परमेश्वराची सेवा करणे -स्तोत्र १२२
Sermon • Submitted • Presented
0 ratings
· 74 viewsFiles
Notes
Transcript
आनंदाने परमेश्वराची सेवा करणे
स्तोत्र १२२
प्रस्तावना
1. दाविद देवाच्या मनासारखा राजा होता -प्रे १३:२२ त्याला उपासना नेहमीच आवडत असे. कारण की तो त्याच्या सर्व इच्छा पुर्ण करीत असे
a. देवाच्या मंदिराकडे जाण्या करिता तो नेहमीच तयार असे -स्तो १२२:१
b. गीत गात हर्षाने सेवा करण्या करिता तो नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करीत असे स्तो. १००:२
2. अनेक लोक चर्च ला येतात परंतू ते दैवी उपासनेचा आनंद घेऊ शकत नाहीत.
a. काही लोक कडेला बसतात किंवा मागे बसतात फक्त इकडे तिकडे पहाण्या व्यतिरीक्त काहीच करत नाहीत.
b. अनेक लोक उपस्थित राहतात पण त्यांची उपस्थिति मंडळीच्या फायद्याची होतेच असे नाही.
c. ज्यांना गाण्याची, वादनाची, वाचनाची किंवा इतर काही जबाबदारी दिलेली असते ते आनंदाने / उत्साहाने करताना दिसत नाहीत.
3. मी स्वत: अनुभवलेल्या गोष्टीतून मी सांगत आहे... आलेले पाहुणे आमच्या मंडळीची ही स्थिती पहात असतात.
मग ते असा विचार करतात...
a. खरच या लोकांना देवाची ओळख झाली आहे का?
b. ह्यांना देवाची सेवा करण्यात आनंद वाटत नाही का?
c. ते त्यांच्या कृती द्वारे आपल्या आजूबाजूच्या बंधु भगिनींना प्रोत्साहित करतात करताना दिसत नाही?
d. मंडळीच्या च्या व्यतिरीक्त मी गरजवंत बंधुला कशी मदत करतो ह्याचा ते विचार करतात का?
म्हणून प्रत्येकाने उपासनेला हजर असताना काळजी घेतली पाहिजे आपण व मंडळी नवीन व्यक्तीला किंवा नवीन विश्वासणा-याला काय प्रदर्शित करत आहोत?
4 जे लोक उपासनेमधे उत्साही असतात की ते त्यांच्या कृती द्वारे इतरांच्या जीवनात उत्साह आणतात व त्यांना आनंदी करतात. पण काही चुका शोधण्यात गर्क असतात, किंवा उपहासात्मक हसून इतरांचा उत्साह घालवतात व काही मोठ्याने बोलून शांतता भंग करतात व चुका दाखवतात किंवा विनोद करतात.
a. मी उपासनेद्वारे देवाच्या जवळ गेलो का? मी माझ्या बंधुला उत्साहित करतो का?
b. माझ्या निस्सीम उपासनेचा दैवी अनुभव माझ्या द्वारे इतरांना होतो का?
I. मंडळीचे एकत्र येणे
A. महत्वाचे काम.....
1. एकमेकांना प्रोत्साही करणे इब्री १०:२४,२५ "आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा."
a. आम्ही जेंव्हा एकत्र येतो तेंव्हा आमची उपासनेची हीच सुरवात असते.
b. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्मिक समज बुद्धी - इब्री १०:२२
"ख-या अंत:करणाने व विश्वासाच्या पुर्ण खातरीने"
2. विश्वासामधे टिकुन रहाणे
आमचे अविश्वासाचे मन असू नये जेणेकरून इतरांना आम्ही विश्वासा पासून दूर ठेऊ -इब्री ३:१२-१४ 12 बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. 13 जोपर्यंत "आज" म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी 'कठीण होऊ' नये. 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.
a. पापांमुळे अंत:करण कठीण करणे व देवाच्या पासून दूर जाणे व मंडळीच्या उपासने पासून दुरजाणे हा फार मोठा धोका असतो
b. प्रथम स्वत: स्थिर होणे व दुस-याला स्थिर करणे - सातत्य टिकविणे स्वत: दर रविवारी येणे
B. आम्हांला मिळालेल्या सुसंधिचा फायदा घेणे ..
1. "आठवड्याच्या पहील्या दिवशी" प्रे २:४२, १करिंथ १६:१,२
a. दर आठवड्याच्या पहील्या दिवशी एकत्र जमण्याची सुसंधी आम्हाला मिळालेली आहे 42ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत
b. भाकरी मोडणे व इतर कामे, प्रार्थना, गीते गाणे इ.
2. पवित्र शास्त्र अभ्यास प्रे. २:४२, २तिम२:२, पवित्र शास्त्राच्या अभ्यासाला हजर राहणे ही सुद्धा एक सुसंधीच आहे
3. सुवार्ता सभांना हजर राहणे -प्रे.१९:९, २तीम४:२
a. दुस-या ठिकाणच्या आयोजित सभांना हजर राहणे,
b. सभेला आलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या साठी प्रार्थना करणे
c. जेष्ठ बंधुंच्या हाताखाली शिकणे व स्वत:ला तयार करणे.
ही देखील देवाच्या समोर लीन होऊन त्याची सेवा करण्याची सुसंधि आहे व ही देखील एक उपासनाच आहे.
II. बाह्यसेवेचा फायदा कसा होतो
A. अभ्यासाने तयारी होते व तयारीने सादरीकरणावर खुप फरक पडतो व वेळ वाचतो.
1. उत्तम सादरिकरणा द्वारे आत्मविश्वास वाढतो व भय निघून जाते
a. अध्यात्मिक जीवनात नवीन ऊर्जा मिळते.
b. प्रत्येक कंटाळवाणी गोष्ट रस घेणारी व आनंद देणारी ठरते
c. तयारी मुळे आमची एकाग्रता वाढते व प्रार्थनामय जीवन प्रबळ होते.
d. "देण्याची धन्यता वाढते" प्रेषित२०:३५
3. रवीवारच्या सभेची तयारी आधीच करुन ठेवणे फार फायद्याचे ठरते, तेथूनच उपासनेला सुरवात होते
a. म्हणजे काळजी रहात नाही व शनिवारी शांत झोप येते.
b. नियोजना मुळे आम्हाला काळजी रहात नाही व रविवार सकाळची आमची वैयक्तीक तयारी करण्या करिता आम्हाला वेळ मिळतो व आम्ही वेळेत चर्च ला येतो, धावपळ व ताणताणावांपासून दूर राहतो व उपासनेचे सादरीकरण उत्तम होते. कारण आमचा देव शिस्त प्रिय आहे.
आमची एक प्रार्थनापुर्वक तयारी फार मोठा प्रभाव पाडुशकते व त्याचा आनंद प्रत्येक व्यक्तिला होतो
B. जे प्रार्थनेला उपस्थित राहिले आहेत त्यांची घ्यावयाची काळजी
1. आपण बंधू म्हणत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला
a. प्रत्येक आलेल्या व्यक्तीची विचारपूस करा. नवीन व्यक्तीची ओळख करुन घ्या व त्यांना पुन्हा येण्याचे आमंत्रण द्या.
b. वेळ काढून त्यांची त्यांचे घरी जाऊन भेट घ्या.
C.स्वत: वेळेवर या व त्यांना वेळेवर येण्यास मदत करा - येण्या-जाण्याची व्यवस्था इ.
2. जे नवीन लोक नेहमी आमच्या सभेला येतात त्यांच्या बाबत विचार करा
1) आपल्या मनाल प्रश्न विचारा .... आम्हीं प्रभुचे शिष्य आहोत हे ते ओळखत आहेत का? यो. १३:३५ 35 "तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात."
2) तुमच्या मधे देवाचे वास्तव्य खरोखर आहे हे ते बोलून दाखवतात का?
१ करिंथ १४:२५ "त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व 'तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे' असे बोलून दाखवील."
b. त्यांचा आदर करा - इब्री १३:२ (अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका)
3. विशेषत: त्यांना जाणवू द्या कि येशू प्रभू आमच्या मधे आहे
a. येशूचे अभिवचन मतय १८:२०
C. उत्तम उपासने साठी स्वत:ला बदला
1. लक्ष द्या व काळजीपुर्वक ऐका
a. जे बंधुजन उपासना चालवत आहेत त्यांच्या कडे लक्ष द्या व प्रसन्न चेह-याने प्रतिसाद द्या. उत्तेजन द्या.
b. जे उत्तम ऐकतील ते तुम्हाविषयी साक्ष देतील - मत्तय ४:२४,२५
2. सुंदर व लयबद्ध गीते गा व समर्पक प्रार्थना करा
a. इफिस ५:१९स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा; 20 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा.
कलसै ३:१६ - ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;
b. प्रार्थना चालू असताना पटलेल्या प्रत्येक मुद्द्याला "आमेन" म्हणा
आमची प्रार्थना असो किंवा गाणे असो ते जर आत्म्याच्या प्रेरणेने व बुद्धिच्या सामर्थाने गाईले तर ते खुपच परिणामकारक होते- १ करिं १४:१५, तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सार्मथ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्थानेही गाणार.
-- उपासना म्हणजे काही प्रेक्षकात बसून खेळावयाचा खेळ नव्हे तर प्रत्येकाचा प्रत्यक्ष सहभाग असणे गरजेचे मगच ती सर्वांना अंतरीक समाधान देते.
D. उपासनेचा आनंद घ्यावयाचा असेल तर नेहमीच पुढे बसा
1. तुम्ही गीतांचा आनंद घेऊ शकता
a. कारण सर्व गायक तुमच्या मागे असतात व तुम्ही उत्तम ऐकू शकता व प्रत्येक गाण्या मधे व संगीता मधे तल्लीन होऊ शकता.
2. दिला जाणा-या संदेशावर कान देऊ शकता
a. पुढे बसल्यामुळे उत्तम ऐकायला येते व्यत्यय कमी असतो
b. मागे बसल्यामुळे पुढील बसलेल्या लोकांच्या हालचाली कडे नकळत आपले लक्ष वेधले जाते व संदेशाकडे लक्ष केंद्रित होत नाही. (उदा. लहान मुलांच्या हालचाली)
E. जेवढे पुढे जाल तेवढे वाढाल
1. जेवढे पुढे याल तेवढे ख्रिस्ता कडे आकर्शिले जाल
a. हा एक शारीरिक व्यायामासारखा प्रकार आहे
- १ तीम ४:७-८ अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर; 8 कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.
2. "देत रहाल तेवढे प्रेम कराल व आपली प्रतिकार शक्ती वाढवाल?"
a. १योहान ३:१६-१९- 16 ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधुकरिता स्वत:चा प्राण अर्पण केला पाहिजे. 17 मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत: ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? 18 मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.
-- तुमची अध्यात्मिक समजबुद्धी वाढवायची असेल तर मंडळीच्या अगदी जवळ या.
सारांश
1. अनेक लोक चर्चला येतात पण आनंदी होऊन किती जातात?
A. सर्वसमर्थ देवाच्या उपासनेची संधी मिळून सुद्धा ते समरूप का होऊ शकत नाहीत अ. कारण पाप त्यांना येशूची आत्म्याने व खरेपणाने उपासना करुन देत नाही.
ब. जगाची काळजी त्यांना उपासना करू देत नाही
क. बंधुंच्या बाबत असलेली द्वेश भावना त्यांना उपासने पासून वंचित ठेवते.
ड. फसवे व्यक्तिमत्व देवाच्या नीतिमत्वा पासून दूर ठेवते व ते खरे उपासक बनू शकत नाही. (लोकही त्यांचे पासून दूर जातात)
B. स्वत:स जपा कारण आपण शेवटच्या काळात आहोत.
1 शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. 2 कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, 3 ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, 4 विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, 5 सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा.
3 मग आनंदी ख्रिस्ती कोण आहेत? जे नेहमी प्रत्येक प्रार्थना सभेला हजर राहतात.
a. They are happy because they are stronger in their relationship
with the Lord and brethren जे आनंदाने देवाची सेवा करण्या करिता शिकतात व पूर्णपणे आत्म्याने व खरेपणाने उपासना करतात ते नेहमीच आनंदी असतात. त्यांचे देवाबरोबर व बंधु वर्गाबरोबर सबंध उत्तम व प्रीती पूर्ण असतात. अनेक लोक आपल्या स्वभावामुळे / सवयी मुळे आपली पत गमावून बसतात व नंतर निराश होतात व उपासना त्यांना कंटाळवाणी होते.
चला तर ज्या आमच्या महान देवाने आमच्या साठी योजना आखली व ज्या ख्रिस्ताने आम्हांला पापा पासून व क्रोधा पासून मुक्त केले त्याची आराधना मनपुर्वक, आमचा दैवि सहाय्यक जो पवित्र आत्मा त्याच्या द्वारे करू या!
दाविद म्हणतो "आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ" असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला स्तो १२२:१
Page 2 of 2
(c) Deepak Kasote015-01-2021
